शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हात उचलणाºयांची कºहाड बाजारपेठेतून धिंड! बघ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 21:23 IST

कºहाड (जि. सातारा) : भरचौकात दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघांचीही सोमवारी न्यायालयापर्यंत चालत धिंड काढली.

ठळक मुद्देन्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली‘खाकी’वर हात उचलणाºया त्या दोघांची धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली

कºहाड (जि. सातारा) : भरचौकात दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघांचीही सोमवारी न्यायालयापर्यंत चालत धिंड काढली. पोलिस जीप ऐनवेळी नादुरुस्त झाल्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयापर्यंत व तेथून पोलिस ठाण्यापर्यंत चालवत नेले.कºहाड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश माने हे रविवारी दुपारी दत्त चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दुचाकीवरून निघालेल्या तीन युवकांना माने यांनी अडवले. दुचाकी चालविणाºया युवकाकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. मात्र, संबंधित युवकाने अरेरावी करीत माने यांना धमकावले. सहायक फौजदार चव्हाण तेथे आले असता त्या युवकाने चव्हाण यांनाही दमदाटी करीत दोघांना लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या अन्य साथीदारानेही पोलिसांना बेदम मारले.त्याही परिस्थितीत हवालदार माने व सहायक फौजदार चव्हाण यांनी एका युवकाला पकडून पोलिस ठाण्यात आणले. तर त्याचा साथीदार तेथून पसार झाला.याप्रकरणी माजी नगराध्यक्षांचा मुलगा सईद अल्ताफ शिकलगार (वय १८, रा. कºहाड) याला पोलिसांनी रविवारी दुपारीच अटक केली. तर पळून गेलेला त्याचा साथीदार इंद्रजित भिंताडे (वय २५, रा. कºहाड) याला रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्या दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करायचे होते. मात्र, ऐनवेळी पोलिस जीपमध्ये बिघाड झाल्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक दीपिका जौंजाळ यांच्यासह पोलिस कर्मचाºयांनी दोन्ही आरोपींना कºहाड शहर पोलिस ठाण्यातून शाहू चौक, दत्त चौक, यशवंत हायस्कूलमार्गे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत चालवत नेले. न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा दोघांनाही त्याच मार्गाने मुख्य बाजारपेठेतून परत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. ‘खाकी’वर हात उचलणाºया त्या दोघांची धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सहायक निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत.एक दिवस पोलिस कोठडीअटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी दुपारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.कºहाड येथे सोमवारी पोलिसांना मारहाण करणाºया आरोपींना पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढून चालवत न्यायालयामध्ये नेले.